11) छत्तीसगड ( Chattisgad )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपला देश ; आपले राज्य

भाग अकरावा दिनांक :- 11 जून 2023 वार - रविवार

11) राज्य - छत्तीसगड माहिती

★ छत्तीसगढ हे नाव १५ व्या शतकात परिसरातील ३६ गडांवरून पडले असावे असा अंदाज आहे. 

★ यापैकी रायपूर आणि रतनपूर क्षेत्रात प्रत्येकी १८ गड आहेत. 

★ या काळाच्या आधी या भागास दंडकारण्य-दक्षिणकोशल या नावाने ओळखले जात होते. 

★ प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथ रामायणनुसार, भगवान श्रीरामांनी आपला वनवासाचा काळ याच भागात घालवला. अशा रीतीने त्याकाळी दंडकारण्य म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र श्रीरामाची कार्यभूमी होती. 

★ इ.स.पूर्व ७२ ते २०० इ.स.पर्यंत सातवाहन राजांनी राज्य केले. 

★ इसवी सन पूर्व ६०० ते १३२४ पर्यंत या भागात नल आणि नाग या भागात आदिवासी हिंदू राजांचे गोंड संस्कृती असलेले राज्य होते.

★ स्वातंत्र्यपूर्व काळात छत्तीसगढ राज्य मध्य प्रांताचा भाग होते. 

★ छत्तीसगड वर काही काळ मराठा साम्राज्याचे नियंत्रण होते. 

★ येथे बस्तर, कांकेर, नांदगाव, खैरागढ, छुईखदान, कावर्धा, रायगढ, सक्ती, सारंगगढ, सुरगुजा, जशपूर, कोरिया, चांगभरवार आणि उदयपूर संस्थान ही १४ छोटी हिंदू संस्थाने होती. 

★ रायपूर, बिलासपूर, दुर्ग ही खालसा राज्ये होती. 

★ भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली छत्तीसगढचा समावेष मध्य भारतात करण्यात आला. 

★ १९५० साली मध्यभारतचे नाव बदलून ते मध्य प्रदेश करण्यात आले. 

★ १ नोव्हेंबर १९५६ला एकदा आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर एकदा मध्य प्रदेश राज्याची नवी रचना करण्यात आली. 

★ या प्रत्येक वेळी छत्तीसगढ राज्य मध्य प्रदेशचाच भाग होते. 

★ १ नोव्हेंबर २०००ला छत्तीसगढ नावाच्या नव्या राज्याची रचना करण्यात आली.


★ दंतेवाडातील ढोलकल गणेशाची ही अनोखी मूर्ती छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील ढोलकल पर्वतावर सुमारे ३००० फूट उंचीवर आहे. 

★ जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान 'माघ' महिन्यात या ठिकाणी एक जत्रा भरते.

★ छत्तीसगढ राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील 10 व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. 

★ लोकसंख्येच्या बाबतीत हे भारतातील 17 वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे.

★ छत्तीसगढ राज्याच्या उत्तरेला उत्तर प्रदेश व झारखंड, वायव्येला मध्य प्रदेश, पश्चिमेला महाराष्ट्र, दक्षिणेला आंध्र प्रदेश व पूर्वेला ओडीशा ही राज्य आहेत.

★ छत्तीसगढ राज्यात २७ जिल्हे आहेत.

★ छत्तीसगढ राज्य वेगळे करण्यात आले तेव्हा येथे १६ जिल्हे होते. २००७ साली २ तर २०१२ साली ९ नवे जिल्हे वेगळे करण्यात आले ज्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या २७ वर पोचली.

★ छत्तीसगड राज्यातील जिल्ह्यांची नावे पुढील प्रमाणे. बालोद, बिलासपुर, बलौदाबाजार, भाटापारा, बलरामपूर, कोराबा, बस्तर केली. बंद, बेमेतारा, बीजापूर, जशपुर, दंतेवाड़ा, धमतरी, दुर्ग, जंजीर चांपा, नारायणपुर, रायगढ़, रायपुर, कांकेर, कबीरधाम, कोंडागाव, कोरिया, महामुंद, मुंगेली, राजनंदगाव, सुकामा, सूरजपुर, सरगुजा.

★ राज्यातील प्रमुख नृत्य प्रकारांमध्ये पंथी, पांडवाणी, राऊत नाच, सुवा, कर्मा, भगोरिया, फाग, लोटा इत्यादींचा समावेश होतो. 

★ यातील बहुतांश नृत्य प्रकार आदिवासी समाजाचे आहेत, जे सण, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांमध्ये वर्षभर साजरे केले जातात.

★ आदिवासी समाजाने गायलेले सोहर गीत हे राज्याचे एक वैशिष्ट्य आहे. 

★ चेर चेरा गाणे नवीन पीक काढणीच्या वेळी गायले जाते.

★ राज्यात गोंड, डोर्ला, हलबा, सावरा, भयना गरिबांध, मांजी, कावर, राजगोंड, कमर सुरगुजा, मुंडा इत्यादी प्रामुख्याने आदिवासी समुदाय आहेत.

★ छत्तीसगडची प्रमुख नदी महानदी ही आहे. याव्यतिरिक्त राज्यातून हसदो, इंद्रावती, गोदावरी, सबरी, रिहन्द, गोपाड, हासदेव, इद, जोंक, कनहार, मंद, पैरी, रेंद, साबरी, सांख, शिवनाथ, सोंदरू, तांडुला या नद्या छत्तीसगड मधून वाहतात.

★ छत्तीसगड राज्याचे भात हे प्रमुख पीक आहे. 

★ भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम कारखाना बाल्को कोरबा येथे आहे.

★ देशाला लागणाऱ्या रेल्वे स्लीपर्सची (रूळांची) शंभर टक्के निर्मिती छत्तीसगड राज्यात होते.

★ छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यात ताट पानी नावाचा उष्ण झरा आहे.

★ छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील चित्रकोट धबधबा हे प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे. धबधब्याची लांबी 29 मीटर आहे. त्याची मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक ऋतूत त्याच्या पाण्याचा रंग बदलतो.

★ कांकेर हे छत्तीसगडच्या मुकुटाचे खरे रत्न आहे. कांकेर हे नैसर्गिक सौंदर्य असलेले एक अद्वितीय जुने शहर आहे. 

★ छत्तीसगढचा राज्य पक्षी डोंगरी मैना आहे.

★ छत्तीसगढचा राज्य प्राणी रान हल्या आहे.

★ छत्तीसगड राज्यात ३ राष्ट्रीय उद्याने आणि १० अभयारण्ये आहेत. 

★ छत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम बाजुला, जगदलपूर शहरापासून सुमारे १७० कि. मी. अंतरावर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान आहे. १९७८ साली या जंगलाला राष्ट्रीय उद्यानचा दर्जा देण्यात आला तर १९८२ साली यास व्याघ्र प्रकल्पांतर्गत टायगर रिझर्वचा दर्जा दिला गेला.

★ कांगेर राष्ट्रीय उद्यानास १९८५ साली आशियातील पहिले बायोस्फियर रिझर्व घोषित करण्यात आले.

★ संजय राष्ट्रीय उद्यान उर्फ गुरू घासीदास राष्ट्रीय उद्यान हे भारतातील मोठ्या क्षेत्रफळाचे राष्ट्रीय उद्यान आहे. १९८१ साली यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.

★ अचानकमार अभयारण्यात बांबू, साल, साजा, बिजा ही मुख्य झाडे आणि वाघ, बिबट्या, रानगवा हे मुख्य प्राणी आढळतात.

★ क्षेत्रफळाचा विचार करता तमोरपिंगला अभयारण्य छत्तीसगढ राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे.

★ नरसिंहगढ अभयारण्य राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचे अभयारण्य आहे.

★ छत्तीसगढ राज्याचा राज्य प्राणी रानरेडा (Wild Buffalo) पामेड व भैरमगड अभयारण्यात पहावयास मिळतो.

★ सीतानादी अभयारण्याच्या जवळच सांढूर नावाचे जलाशय असून येथे नेहमी पर्यटक येत असतात.

★ साक्षरतेच्या बाबतीत बीजापूर जिल्ह्याचा देशात खालून दुसरा क्रमांक लागतो. येथील केवळ ४०.९ टक्के जनता साक्षर आहे.

★ रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे.

★ बिलासपूर छत्तीसगढमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. 

★ दंतेवाडा येथे दंतेश्वरी देवीचे मंदिर आहे, जे की येथील आदिवासींचे आराध्यदैवत आहे. हे ठिकाण शाकिनी व डाकिनी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.

★ धमतरी येथे हाथीकोट, अमृत कुंड, दंतेश्वरी गुफा ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.

★ बस्तर जिल्ह्यास 'दक्षिण छत्तीसगढ' असेही म्हणतात.या जिल्ह्यातील 'बस्तरचा दसरा' अतिशय प्रसिद्ध आहे.

★ रायगढ येथे हिंदीसोबत छत्तीसगढी व उडिया ह्या भाषादेखील वापरल्या जातात.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

छत्तीसगड राज्य प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )