14) तामिळनाडू ( Tamilnadu )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपला देश ; आपले राज्य

भाग पंधरावा दिनांक :- 14 जून 2023 वार - बुधवार

14) राज्य - तामिळनाडू माहिती

★ तमिळनाडू म्हणजे  "तमिळ लोकांचे राष्ट्र" 

★ चेन्नईचे पूर्वीचे नाव मद्रास असून, हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तसेच दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते 

★ तमिळ ही येथील लोकांची राज्यभाषा आहे.

★ भारतातील ‘अभिजात भाषे’चा (Classical Language) पहिला मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोक ही भाषा वापरतात.

★ श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया आणि मॉरिशिस या देशात देखील तमिळ बोलल्या जाते.

★ तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. 

★ तामिळनाडू च्या पश्चिमेला केरळ, वायव्येला कर्नाटक, दक्षिणेस भारतीय महासागर व श्रीलंका, पूर्वेस बंगालचा उपसागर, तसेच केंद्रशासित प्रदेश (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतुःसीमा आहेत.

★ दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते. 

★ क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. 

★ तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. 

★ भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये (१०.५६ टक्के) असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. 

★ वस्त्रोद्योग, साखर व सिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. पण त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात. 

★ सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. 

★ तामिळनाडू आपल्या सर्वाेत्तम परिवहन सुविधेसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.

★ तामिळनाडूचे क्षेत्रफळ १,३०,०५८ चौ.कि.मी असून लोकसंख्या ७,२१,३८,९५८ एवढी आहे. 

★ तामिळनाडूची साक्षरता ८०.३३ टक्के आहे. 

★तांदूळ, रागी, कापूस व ऊस ही तामिळनाडूतील प्रमुख पिके आहेत. 

★तामिळनाडूतील कावेरी नदी, पालर नदी व वैगई नदी या प्रमुख नद्या आहेत.

★तमिळनाडूत ३२ जिल्हे आहेत.

★हिमालय सोडून भारतातले सर्वात उंच शिखर तामिळनाडू मधील आनैमुदई आहे, ज्याची उंची २६९५ मिटर आहे.

★जेव्हा भारत राष्ट्रीय मानदंड स्वीकारला तेव्हा तामिळ ही भारताची शास्त्रीय भाषा म्हणून ओळखली जाणारी पहिली भाषा होती.

★भरतनाट्यम् ही एक अभिजात नृत्यशैली तामिळनाडूचे राज्यनृत्य आहे.

★तामिळनाडू चा राज्य खेळ कबड्डी आहे.

★महाबलीपुरम, ज्याला ममल्लापुरम म्हणूनही ओळखले जाते, हे दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले एक मनमोहक तटीय शहर आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते.

★ मदुराई, ज्याला "भारताचे मंदिर शहर" म्हणून संबोधले जाते, येथे मीनाक्षी मंदीर आहे.

★ मदुराईमध्ये साजरा होणारा वार्षिक चिथिराई उत्सव हा एक भव्य देखावा आहे.

★ तामिळनाडूच्या दक्षिणेकडील राज्यामध्ये निलगिरी पर्वतांच्या मध्यभागी वसलेले, उटी, ज्याला उधगमंडलम असेही म्हणतात, हे एक नयनरम्य हिल स्टेशन आहे ज्याला "हिल स्टेशन्सची राणी" म्हणून संबोधले जाते.

★ तामिळनाडूच्या मोहक टेकड्यांमध्ये वसलेले कोडाईकनाल, ज्याला "हिल स्टेशन्सची राजकुमारी" म्हणून संबोधले जाते.

★ चेन्नईचा मरीना बीच, जगातील सर्वात लांब शहरी समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे.

★ "भगवान रामाची भूमी" म्हणजे रामेश्वरम होय.

★ रामेश्वरमचे केंद्रस्थान रामनाथस्वामी मंदिर आहे, जे भगवान शिवाला समर्पित असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

★ रामेश्वरमला धनुष्कोडी बीच आणि अग्नितीर्थम सारख्या प्राचीन समुद्रकिनारा आहे.

★ तंजावर शहराच्या आजूबाजूच्या सुपीक जमिनीत तांदूळाचे मुबलक पीक येते, ज्यामुळे त्याला "तामिळनाडूचा तांदूळ बाऊल" असे नाव दिले जाते.

★ अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागराच्या संगमाच्या ठिकाणी कन्याकुमारी वसलेले आहे. 

★ कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक आहे. 

★ कोईम्बतूर हे "दक्षिण भारताचे मँचेस्टर" म्हणून ओळखले जाते, येथे वस्त्रोद्योग व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.

★ तिरुचिरापल्ली येथे श्री रंगनाथस्वामी मंदिर देखील आहे, जे जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे.

★ तिरुचिरापल्ली, ज्याला त्रिची म्हणूनही ओळखले जाते.

★ तामिळनाडू राज्यात निसर्गसंपन्न असे स्थळ म्हणजे उटी होय.

★ मुदुमलाई नॅशनल पार्क हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच हत्ती, बिबट्या, गौर आणि असंख्य पक्ष्यांच्या प्रजातींसह विविध प्रकारच्या वन्यजीव प्रजाती आहेत.

★ चेट्टीनाड येथे सुशोभित नक्षीकाम, आकर्षक अंगण आणि प्रशस्त हॉल यांनी सुशोभित केलेली ही भव्य घरे, चेट्टियार समुदायाच्या समृद्ध जीवनशैलीची झलक देतात.

★ कांचीपुरम हे 'हजारोंच्या शहराचे शहर’ म्हणून ओळखले जाते, ते फक्त त्याच्या विशिष्ट रेशीम साड्यासाठी प्रसिद्ध नाही तर ते पल्लव राजवंशाची राजधानी होती.

★ विलुप्पुरम हा तामिळनाडूमधील सर्वात मोठा जिल्हा आहे.

★ भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये(१०.५६ टक्के)असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो.

★ राज्याचे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई येथे आहे आणि देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

★ इतर दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुचिरापल्ली आणि कोईम्बतूर येथे आहेत.

★ टेम्पल टाउन" म्हणून ओळखले जाणारे कुंभकोणम हे अनेक प्राचीन आणि पवित्र मंदिरांचे घर आहे.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

तामिळनाडू राज्य प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )