15) तेलंगणा ( Telangana )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपला देश ; आपले राज्य

भाग पंधरावा दिनांक :- 18 जून 2023 वार - रविवार

15) राज्य - तेलंगणा माहिती

◆ तेलंगण (लेखनभेद : तेलंगणा किंवा तेलंगाणा) भारताचे २९वे राज्य आहे. 

◆ आंध्रप्रदेश राज्यातून वेगळे होऊन ०२ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्य स्थापन झाले 

◆ या प्रदेशाची प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती.

◆ तेलंगण भौगोलिक दृष्ट्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलगत आहे. 

◆ तांदूळ हे येथील मुख्य पीक आहे.

◆ हा प्रदेश गोदावरी खोऱ्यात असून हा भाग ऐतिहासिक काळात सातवाहन (इ.स.पू. २२१ - इ.स. २१८), गोवळकोंड्याची कुतुबशाही (इ.स. १५२० - इ.स. १६८७) आणि हैदराबादचा निजाम (इ.स. १७२४ - इ.स. १९४८) यांच्या सत्तेखाली राहिला. 

◆ इ.स.च्या विसाव्या व एकविसाव्या शतकात साम्यवाद आणि नक्षल विचारप्रणालींचा लक्षणीय प्रभाव या प्रदेशावर आढळतो. 

◆ तेलंगणा राज्यातील मुख्य नद्या - कृष्णा, गोदावरी, तुंगभद्रा, मांजरा आणि वैनगंगा नदी.

◆ हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर इ.स. १९४८ साली हा भाग स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाला. 

◆ हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

◆ तेलंगणा राज्याची तेलगू ही प्रमुख भाषा आहे.

◆ तेलंगण राज्यात 33 जिल्हे आहेत.

◆ दाक्षिणात्य भाषांतील चित्रपट निर्मितीचे हैद्राबाद अग्रगण्य केंद्र आहे.

◆ हैद्राबाद येथे चारमिनार आहे या संरचनेत चार मिनार आहेत, प्रत्येक ५६ मीटर उंच आहे, ज्याची स्थापना महंमद कुली कुत्ब शाह याने केली.

◆ हैद्राबाद मध्ये २,००० एकरांवर पसरलेल्या रामोजी फिल्म सिटीची स्थापना प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि मीडिया उद्योजक रामोजी राव यांनी १९९६ मध्ये केली होती.

◆ गोलकोंडा किल्ला त्याच्या हिऱ्यांच्या खाणींसाठी ओळखला जात होता

◆ हैद्राबाद शहरामध्ये बिरला मंदीर, सलारजंग म्युझियम,  किल्ला इत्यादी स्थळे प्रसिद्ध आहेत.

◆ बंजारा हिल्स हा हैद्राबाद शहरातील सर्वात उंच भाग आहे.

◆ हुसेन सागर तलाव हे हैदराबाद शहराच्या मध्यभागी वसलेले मानवनिर्मित तलाव आहे. त्या तलावातील गौतम बुद्धाचा पुतळा आकर्षणाचे केंद्र आहे.

◆ तेलुगू आणि उर्दूचा येथील हिंदीवर परिणाम होऊन हैदराबादी हिंदी ही नवी शैली पुढे आली.

◆ आपल्या खास पद्धतीच्या पक्वान्नांसाठीही, विशेषतः मांसाहारी पक्वान्नांसाठी, हैदराबाद प्रसिद्ध आहे. हैदराबादी बिर्याणी हा पदार्थ जगभरात नावाजलेला आहे.

◆ हैदराबादेतील महात्मा गांधी बसस्थानक हे आशियातील पहिल्या पाच सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे.

◆ हैदराबाद डेक्कन (नामपल्ली), काचीगुडा आणि सिकंदराबाद ही तीन प्रमुख रेल्वे स्थानके शहरात आहेत

◆ हैदराबादेत २ मेट्रो मार्ग कार्यरत आहेत.

◆ हैदराबादेत मार्च २००८ मध्ये शमशाबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नवा अत्याधुनिक विमानतळ निर्माण करण्यात आला.

◆ हैद्राबाद मध्ये दोन स्टेडियम आहेत,  एक लालबहादूर स्टेडियम आणि दुसरे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे.

◆ हजार खांबांचे मंदिर, ज्याला रुद्रेश्वर स्वामी मंदिर असेही म्हणतात, हे दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील हनमकोंडा शहरात स्थित एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.

◆ वरंगल हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. 

◆ वरंगल येथे काकतीय विद्यापीठ हे प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे.

◆ पालमपेट येथे रामाप्पा मंदीर आहे, ज्याला रामलिंगेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

◆ गोदावरी नदी निजामाबाद जिल्ह्यातील कंदकुर्ती येथे तेलंगणात प्रवेश करते.

◆ निजामाबाद जिल्ह्यातील कंदकुर्ती हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक श्री केशव बळीराम हेडगेवार यांचे जन्मस्थान आहे. 

◆ निजामाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवरील पोचमपाड धरण आहे.

◆ लोकसंख्येनुसार खम्मम हे तेलंगणामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

◆ रामगुंडम येथे दक्षिण भारतामधील सर्वात मोठे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे. 

◆ नालगोंडा जिल्ह्यात कृष्णा नदीवरील नागर्जूनसागर धरण आहे. जगातील सर्वात मोठे दगडी धरणांपैकी एक आहे.

◆ यादगिरीगुट्टा मंदिर, ज्याला श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर असेही म्हटले जाते, हे यादगिरीगुट्टा येथे स्थित एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. 

◆ आदिलाबाद कापसाच्या समृद्ध लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आदिलाबादला ‘व्हाइट गोल्ड सिटी’ असेही संबोधले जाते. 

◆ आदिलाबादला "दक्षिण भारताचे प्रवेशद्वार" असेही म्हणतात.

◆ आदिलाबादमध्ये तेलगूसह बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांमध्ये हिंदी, उर्दू आणि गोंडी यांचा समावेश होतो.

◆ कुंतला फॉल्स हा आदिलाबाद जिल्ह्यात स्थित एक सुंदर धबधबा आहे.

◆ इथिपोथला धबधबा हा नागार्जुन सागर जवळ स्थित एक नयनरम्य धबधबा आहे. हा धबधबा चंद्रवांका वागू, नक्कला वागू आणि तुम्माला वागू या तीन प्रवाहांच्या अभिसरणाने तयार झाला आहे. या धबधब्याची उंची सुमारे ७० फूट आहे.

◆ लकनवरम सरोवर हे तेलंगणा राज्यात स्थित एक निसर्गरम्य गोड्या पाण्याचे सरोवर आहे.

◆ भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय सिकंदराबाद रेल्वे स्थानक येथे आहे.

◆ निर्मल जिल्ह्यातील बासर येथे गोदावरी नदीच्या काठी श्री ज्ञान सरस्वती मंदिर आहे.


◆ निर्मल जिल्ह्यात कडम धरण आहे.

  • मंचिर्याल जिल्ह्यात चेन्नूरजवळील मगरींचे अभयारण्य आणि कावल व्याघ्र प्रकल्पाच्या एका भागाखाली घनदाट जंगल आहे.
  • गुडेमगुट्टा श्री सत्यनारायण स्वामी मंदिर हे मंचिर्याल जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
  • गांधारी किल्ला (गांधारी कोटा) हा दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील मंचिर्याल जिल्ह्यातील मंदामरी मंडळात बोक्कलागुट्टाजवळ स्थित एक डोंगरी किल्ला आहे.
  • सिरिसिल्ला हे टेक्सटाइल टाउन म्हणून प्रसिद्ध आहे.
  • ऐतिहासिक वेमुलवाडा मंदिर सिरिसिल्ला शहरापासून १० किमी अंतरावर आहे. येथे श्री राजराजेश्वर हेमाडपंथी मंदीर आहे. 
  • श्री नृसिंह स्वामीचे मंदीर करीमनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावरील धर्मपुरी येथे आहे.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

तेलंगणा राज्य प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )