संदेश

जुलाई, 2023 की पोस्ट दिखाई जा रही हैं

21) मध्यप्रदेश ( Madhyapradesh )

चित्र
रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य भाग विसावा दिनांक :- 30 जुलै 2023 वार - रविवार 20) राज्य - मध्यप्रदेश  माहिती रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य ● मध्यप्रदेश हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. ● २०११ च्या जनगणनेनुसार मध्यप्रदेश लोकसंख्येत ६ व्या क्रमांकावर आहे.  ● मध्यप्रदेशला भारताचे ह्रदय देखील म्हटले जाते, कारण ते भारत देशाच्या मध्यावर आहे.  ● मध्य प्रदेशात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला " टायगर स्टेट " या नावाने सुद्धा ओळखले जाते.  ● फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून हा प्रदेश ओळखला जात होता. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती. ● राज्याचे ६ सांस्कृतिक विभाग आहेत ; निमाड, मालवा, बुंदेलखंड, बघेलखंड, महाकौशल आणि ग्वालियर. ● भारताच्या मध्य प्रदेश हे राज्य, भाषावार प्रांतरचनेनंतर १ नोव्हेंबर इ.स. १९५६ ला बनवले गेले.  ● १ नोव्हेंबर इ.स. २०००ला पुन्हा त्यातून छत्तीसगढ हा विभाग वेगळा होऊन त्याचे स्वतंत्र्य राज्य निर्माण केले गेले. ● नर्मदा नदीच्या ...

20 ) मणिपूर ( Manipur )

चित्र
रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य भाग विसावा दिनांक :- 23 जुलै 2023 वार - रविवार 20) राज्य -   मणिपूर माहिती ◆ मणिपूर हे भारत देशेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे.  ◆ २१ जानेवारी १९७२ रोजी मणिपूरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. ◆ मणिपूरच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिणेस मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये तर पूर्वेस म्यानमार हा देश आहे.  ◆ इंफाळ ही मणिपूरची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे.  ◆ मणिपूर राज्याचे क्षेत्रफळ २२,३२७ चौ.किमी. एवढे आहे; लोकसंख्या २७,२१,७५६ एवढी आहे.  ◆ मणिपुरी ही येथील प्रमुख भाषा आहे.  ◆ मणिपुरी ही तिबेटो-बर्मन भाषा आहे,  आणि तिची स्वतःची अनोखी लिपी आहे जी मेईतेई लिपी म्हणून ओळखली जाते. ◆ मणिपूरची साक्षरता ७९.८५ टक्के आहे.  ◆ तांदूळ, मोहरी व ऊस येथील प्रमुख पिके आहेत. ◆ संत्री, अननस आणि केळी ही काही प्रमुख फळे पिकवल्या जाणार्‍या फळबागांसाठीही राज्य ओळखले जाते. ◆ राज्यात नैसर्गिक वायूचे महत्त्वपूर्ण साठे आहेत, ज्याचा व्यावसायिक वापरासाठी शोध सुरू आहे. ◆ लोकटक सरोवर, ईशान्य...

19) बिहार ( Bihar )

चित्र
रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य   दिनांक :- 16 जुलै 2023 वार - रविवार 19) राज्य -  बिहार  माहिती ◆ बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत.  ◆ बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी एवढे आहे.  ◆ बिहारची लोकसंख्या २,७७,०४,२३६ एवढी आहे. साक्षरता ६३.८२ टक्के आहे.  ◆ हिंदी ही बिहारची प्रमुख भाषा आहे तर भोजपुरी ही बिहारची बोलीभाषा आहे.ती प्रामुख्याने बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात बोलली जाते.  ◆ तांदूळ, गहू व मका ही बिहार राज्यातील प्रमुख पिके आहेत. ◆ पाटणा हे गंगा व शोण नद्यांच्या संगमावरील बिहारचे राजधानीचे ठिकाण. प्राचीन मगधची राजधानी होती. ◆ नालंदा हे प्राचीन गौरवशाली विद्यापीठाचे स्थान बिहार मध्ये आहे. ◆ जात- जतीन हे लोकनृत्य खूप लोकप्रिय आहे.  ◆ बिहार राज्यातील प्रमुख नदी गंगा ही आहे. ◆ 'छठ’ म्हणजे कार्तिक शुद्ध षष्ठी या सूर्यपूजेच्या सणाला बिहारी स्त्रियांत विशेष महत्त्व आहे.  ◆ पावापुरी येथे भगवान महावीरांचे पाचशे इ.पू.मध्ये अंत्यसंकार करण्यात आले ह...

18) प. बंगाल ( West Bangal )

चित्र
रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य भाग आठरावा दिनांक :- 09 जुलै 2023 वार - रविवार 18) राज्य -  प. बंगाल  माहिती रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य ◆ पश्चिम बंगाल भारताच्या पूर्व भागामध्ये स्थित एक राज्य आहे.  ◆ प. बंगालची मुख्य भाषा बंगाली आहे.  ◆ पश्चिम बंगालची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली होती.  ◆ पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता आहे.  ◆ पश्चिम बंगालमधील लोक फुटबॉल आणि क्रिकेट हा खेळ सर्वात जास्त खेळतात.  ◆ पश्चिम बंगालचे क्षेत्रफळ 87,854 चौरस किलोमीटर आहे.  ◆ क्षेत्रफळाच्या दृष्टीने पश्चिम बंगाल हे चौदावे सर्वात मोठे राज्य आहे.  ◆ पश्चिम बंगालच्या उत्तरेस नेपाळ, सिक्कीम व भूतान यांच्या सीमा भिडल्या आहेत. पश्चिमेस बिहार व ओरिसा ही राज्ये, तर पूर्वेस आसाम व बांगला देशाची सीमा असून, गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातील ही सीमा अत्यंत गुंतागुंतीची  आहे.  ◆ राज्याची दक्षिणोत्तर लांबी 800 किमी. व रुंदी 300 किमी. आहे.  ◆ लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमा...

17) पंजाब ( Panjab )

चित्र
रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य भाग सतरावा दिनांक :- 02 जुलै 2023 वार - रविवार 17) राज्य -  पंजाब  माहिती पंजाब राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 या दिवशी करण्यात आली. पंजाब राज्यात सर्वात मोठे शहर लुधियाना हे आहे.  पंजाब हे राज्य पाकिस्तानच्या सीमेलगत आहे.  पंजाब राज्याची राजधानी चंदिगड ही आहे. पंजाबच्या पश्चिमेला पाकिस्तानी पंजाब, उत्तरेला जम्मू आणि काश्मीर , ईशान्येला हिमाचल प्रदेश, दक्षिण आणि आग्नेयेला हरियाणा व चंदीगडचा केंद्रशासित प्रदेश आणि नैऋत्येला राजस्थान आहे. अमृतसर, लुधियाना, जालंधर, पटियाला आणि भटिंडा ही पंजाबमधील प्रमुख शहरे आहेत . पंजाबी ही पंजाबची प्रमुख भाषा आहे. 15 व 16 व्या शतकात गुरुनानक यांनी शीख धर्माची स्थापना केली,  यांच्या शिकवणीतून पंजाबच्या इतिहासाला भक्‍तीमार्गाकडे वळण मिळाले. गुरुगोविंदसिंह यांनी शिखांचे दहावे गुरू म्हणून खालसा पंथाची स्थापना करून कित्येक शतकापासून चालत आलेल्या जुलुमशाही व गुलामगिरीला आव्हान दिले आणि सर्वधर्मसमभाव व देशप्रेमावर आधारित नव्या प...