18) प. बंगाल ( West Bangal )

रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपला देश ; आपले राज्य

भाग आठरावा दिनांक :- 09 जुलै 2023 वार - रविवार

18) राज्य - प. बंगाल माहिती

रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपला देश ; आपले राज्य

◆ पश्चिम बंगाल भारताच्या पूर्व भागामध्ये स्थित एक राज्य आहे. 

◆ प. बंगालची मुख्य भाषा बंगाली आहे. 

◆ पश्चिम बंगालची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली होती. 

◆ पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता आहे. 

◆ पश्चिम बंगालमधील लोक फुटबॉल आणि क्रिकेट हा खेळ सर्वात जास्त खेळतात. 

◆ पश्चिम बंगालचे क्षेत्रफळ 87,854 चौरस किलोमीटर आहे. 

◆ क्षेत्रफळाच्या दृष्टीने पश्चिम बंगाल हे चौदावे सर्वात मोठे राज्य आहे. 

◆ पश्चिम बंगालच्या उत्तरेस नेपाळ, सिक्कीम व भूतान यांच्या सीमा भिडल्या आहेत. पश्चिमेस बिहार व ओरिसा ही राज्ये, तर पूर्वेस आसाम व बांगला देशाची सीमा असून, गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातील ही सीमा अत्यंत गुंतागुंतीची  आहे. 

◆ राज्याची दक्षिणोत्तर लांबी 800 किमी. व रुंदी 300 किमी. आहे. 

◆ लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. 

◆ तसेच जगातील सातव्या सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रदेश आहे. 

◆ राज्याची राजधानी कोलकाता हे " भारताची सांस्कृतिक राजधानी " म्हणून ओळखले जाते.

◆ भारतातील सर्वात मोठे दुसरे क्रिकेटचे मैदान ईडन गार्डन कोलकता येथे आहे. 

◆ कोलकता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव डमडम आहे.

◆ भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे गीत लिहिलेले गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म प. बंगालच्या कोलकता शहरातील शांतिनिकेतन येथे झाला. 

◆ प. बंगाल मध्ये 23 जिल्हे आहेत. 

◆ राज्याच्या उत्तर भागात दार्जिलिंग हे हिमालयातील थंड हवेचे ठिकाण आहे.

◆ 1905 मध्ये लॉर्ड डलहौसीने बंगालची फाळणी केली पण लोकांच्या पुढाकाराने 1911 मध्ये बंगाल पुन्हा एकत्र आला.

◆ पश्चिम बंगालमधील पारंपारिक पोशाख परंपरेने पुरुष धोतर घालतात आणि स्त्रिया साडी घालतात. 

◆ राज्यात दगडी कोळसा व आगबंद माती ही दोन खनिजे विपुल प्रमाणात आढळतात. 

◆ भारतातील कोळशाची पहिली आधुनिक खाण राणीगंज येथे याच राज्यात सुरू झाली. 

◆ कोळसा उत्पादनात या राज्याचा देशात तिसरा क्रमांक आहे.

◆ जलपैगुरी, दार्जिलिंग व प. दिनाजपूर या जिल्ह्यांत गेंडा, हत्ती, हरिण आणि वाघ हे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत.

◆ त्यांच्यासाठी जलदापारा अभयारण्य विकसित करण्यात आले असून त्याचे क्षेत्रफळ 93 चौ. किमी. आहे. 

◆ शेती हा राज्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. 

◆ तांदूळ हे पश्चिम बंगालचे प्रमुख अन्न पीक मानले जाते.

◆ कोलकाता या शहराला ‘आनंदाचं शहर’ असंही संबोधलं जातं.

◆ गंगासागर हे धार्मिक स्थळ आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात देशभरातील लाखो भाविक येथे पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी येतात.

◆ सुंदरबन येथे बेंगॉल टायगर प्रसिद्ध आहे आणि जगातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे.

◆ कुर्सिओंग हे दार्जिलिंगच्या जवळ असलेलं हिल स्टेशन आहे. याला ‘व्हाइट ऑर्किड्सची भूमी’ असंही म्हणतात. इथं वारंवार पाऊस पडत असतो.

◆ कोलकता येथे द व्हिक्टोरिया मेमोरियल आणि हावडा ब्रिज हे प्रसिद्ध स्थळ आहेत

◆ सिलीगुडी हे "ईशान्येचे प्रवेशद्वार" म्हणून पश्चिम बंगालमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. 

◆ सिलीगुडीमध्ये महानंदा वीयर वन्यजीव अभयारण्य आणि द सायन्स सिटीचा ही आनंद घेऊ शकता.

◆ चहाच्या मळ्यांनी वेढलेले दार्जिलिंग निसर्गरम्य, रोमँटिक दृश्ये देते. 

◆ हल्दिया हे समुद्र किनार्‍यावर वसलेले एक सुंदर शहर आहे ज्यात आकर्षक मरीन ड्राइव्ह आणि आकर्षक दृश्ये आहेत. 


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

प. बंगाल राज्य प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )