19) बिहार ( Bihar )

रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपला देश ; आपले राज्य 

दिनांक :- 16 जुलै 2023 वार - रविवार

19) राज्य - बिहार माहिती


◆ बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत. 

◆ बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी एवढे आहे. 

◆ बिहारची लोकसंख्या २,७७,०४,२३६ एवढी आहे. साक्षरता ६३.८२ टक्के आहे. 

◆ हिंदी ही बिहारची प्रमुख भाषा आहे तर भोजपुरी ही बिहारची बोलीभाषा आहे.ती प्रामुख्याने बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात बोलली जाते. 

◆ तांदूळ, गहू व मका ही बिहार राज्यातील प्रमुख पिके आहेत.

◆ पाटणा हे गंगा व शोण नद्यांच्या संगमावरील बिहारचे राजधानीचे ठिकाण. प्राचीन मगधची राजधानी होती.

◆ नालंदा हे प्राचीन गौरवशाली विद्यापीठाचे स्थान बिहार मध्ये आहे.

◆ जात- जतीन हे लोकनृत्य खूप लोकप्रिय आहे. 

◆ बिहार राज्यातील प्रमुख नदी गंगा ही आहे.

◆ 'छठ’ म्हणजे कार्तिक शुद्ध षष्ठी या सूर्यपूजेच्या सणाला बिहारी स्त्रियांत विशेष महत्त्व आहे. 

◆ पावापुरी येथे भगवान महावीरांचे पाचशे इ.पू.मध्ये अंत्यसंकार करण्यात आले होते.

◆ राजगीर शहर जैन आणि बौद्ध धर्माशी संबंधित आहे

◆ लोकसंख्येच्या बाबतीत बिहार हे भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे, तर क्षेत्रफळाच्या बाबतीत 12 वा क्रमांक आहे. 

◆ 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहारच्या दक्षिणेकडील भागातून झारखंड या नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली. 

◆ बिहार राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प वाल्मिकीनगर येथे आहे.

◆ बिहार राज्यात 38 जिल्हे समाविष्ट आहेत

◆ नवलखा पॅलेस हे बिहारमधील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. हे मधुबनी पर्यटनाजवळील राजनगरमध्ये आहे. हा महाल बिहारचे महाराज रामेश्वर सिंह यांनी बांधला होता.

◆ वैशाली हे तीर्थक्षेत्र आहे. जे बिहारमध्ये आहे. भगवान महावीर यांचा जन्म वैशाली येथे झाला. येथे दरवर्षी शेकडो लोक येतात. हे नाव राजा विशालच्या नावावरून ठेवण्यात आले.

◆ मधुबनीची पेंटिंग देशभर प्रसिद्ध आहे. मधुबनी हे बिहारमधील एक छोटेसे शहर आहे. हे एक प्राचीन शहर आहे जे मधुबनी कला आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते.

◆ बोधगया हे बिहारमध्ये भेट देण्याच्या ठिकाणांपैकी एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी याला विशेष महत्त्व आहे.

◆ भगवान गौतम बुद्ध यांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली होती. 


◆ माता सीतेचा जन्म बिहारच्या मिथिला येथे झाला. मिथिला हे बिहारमधील सर्वात खास ठिकाण आहे.

◆ बिहारमधील हाजीपूरची केळी आणि मुझफ्फरपूरची लिची खूप प्रसिद्ध आहेत.

◆ पारसनाथ हे सर्वोच्च शिखर (१,३६६ मी.) हजारीबाग जिल्ह्यात आहे.

◆ फणसाचा उपयोग भाजीसाठी अधिक करतात. 

◆ पोह्यांना ते ‘चूडा’ म्हणतात व ते दही किंवा दुधाबरोबर खातात


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

बिहार राज्य प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........! अ

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )