17) पंजाब ( Panjab )
रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपला देश ; आपले राज्य
भाग सतरावा दिनांक :- 02 जुलै 2023 वार - रविवार
17) राज्य - पंजाब माहिती
पंजाब राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 या दिवशी करण्यात आली.
पंजाब राज्यात सर्वात मोठे शहर लुधियाना हे आहे.
पंजाब हे राज्य पाकिस्तानच्या सीमेलगत आहे.
पंजाब राज्याची राजधानी चंदिगड ही आहे.
पंजाबच्या पश्चिमेला पाकिस्तानी पंजाब, उत्तरेला जम्मू आणि काश्मीर , ईशान्येला हिमाचल प्रदेश, दक्षिण आणि आग्नेयेला हरियाणा व चंदीगडचा केंद्रशासित प्रदेश आणि नैऋत्येला राजस्थान आहे.
अमृतसर, लुधियाना, जालंधर, पटियाला आणि भटिंडा ही पंजाबमधील प्रमुख शहरे आहेत .
पंजाबी ही पंजाबची प्रमुख भाषा आहे.
15 व 16 व्या शतकात गुरुनानक यांनी शीख धर्माची स्थापना केली, यांच्या शिकवणीतून पंजाबच्या इतिहासाला भक्तीमार्गाकडे वळण मिळाले.
गुरुगोविंदसिंह यांनी शिखांचे दहावे गुरू म्हणून खालसा पंथाची स्थापना करून कित्येक शतकापासून चालत आलेल्या जुलुमशाही व गुलामगिरीला आव्हान दिले आणि सर्वधर्मसमभाव व देशप्रेमावर आधारित नव्या पंजाबची स्थापना केली.
लाला लजपत राय यांना पंजाब केसरी असे म्हटले जाते.
पंजाब मध्ये एकूण 23 जिल्हे आहेत.
राज्यात शिवालिक पर्वतांची रांग आहे.
झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास या पाच नद्यांचे राज्य म्हणून पंजाब ओळखले जाते.
चिनाब ही पंजाब राज्यातील मोठी नदी आहे.
पंजाब मधील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. पंजाब हे कृषीप्रधान राज्य आहे.
पंजाब राज्यात वाघा बॉर्डर आहे.
पंजाबमध्ये सर्वाधिक गव्हाची पेरणी केली जाते.
भारतीय पंजाबला भारताचे ग्रॅन-स्टोअर म्हटले जाते.
भारतातील सर्वात श्रीमंत लोक पंजाब राज्यात आढळून आहेत.
राज्यात जवळपास 202 लाख लघुउद्योग आहेत.
पंजाब मध्ये बैसाखी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
राज्याची बहुतांश लोकसंख्या शिख धर्मीय आहे.
पंजाब राज्यातील भांगडा लोकनृत्य संपूर्ण भारतभर लोकप्रिय आहे.
मिर्जा साहिबान, हीर रांझा, सोहनी महिवाल, सासी पुन्नुन, जग्गा जाट, दुल्ला भट्टी आदींच्या लोककथा पंजाबात खूप लोकप्रिय आहेत.
लोकसाहित्यात शहामुखी आणि गुरूमुखी लिपीतील साहित्य सापडते.
पंजाब हे क्षेत्रफळानुसार १९वे सर्वात मोठे भारतीय राज्य बनले आहे
पंजाब हे लोकसंख्येनुसार 16 वे सर्वात मोठे भारतीय राज्य आहे.
शिरोमणी अकाली दल हा पंजाबमधील मुख्य पक्ष आहे.
पंजाबचे पॅरिस म्हणून ओळखले जाणारे कपूरथला याच ठिकाणी 1499 मध्ये गुरु नानक यांना ज्ञान प्राप्त झाले.
चंदीगडची प्रमुख पर्यटन स्थळे म्हणजे रॉक गार्डन होय.
सरहिंद फतेहगढ हे पंजाबमधील एक ऐतिहासिक शहर आहे.
पटियाला मध्ये शिश महाल आहे.
लस्सी हे पंजाब मधील आवडते पेय आहे.
छोले बटोरे, मक्के की रोटी सरसो की साग, तंदुरी हे खाद्य लोकप्रिय आहेत.
जालियनवाला बाग हत्याकांड पंजाब राज्यात घडले.
रणजित सिंग यांनी पंजाब राज्याची निर्मिती केली.
सरहिंद फतेहगढ़ यास भारताचे प्रवेशद्वार असे संबोधले जाते.
मोहाली येथे क्रिकेट स्टेडियम आहे.
अमृतसर येथे सुवर्णमंदिर आहे.
पठानकोट हे काश्मीर व कांगडा खोऱ्यांचे प्रवेशद्वार
पतियाळा हे ऐतिहासिक शहर आहे.
भटिंडा हे शहर व किल्ला असून रजिया सुलताना हीस तिथे बंदी करून ठेवले होते.
रूपनगर हे प्रसिद्ध शहर आहे.
राज्यात हडप्पा संस्कृतीचे अवशेष देखील आढळतात.
लुधियाना हे प्रमुख औद्योगिक शहर असून सरहिंद हे मोगलकालीन ऐतिहासिक वारसा दाखविणारे शहर आहे.
हुसैनिवाला येथे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे स्मारक आहे.
होशियारपूर हे वैदिक संस्कृतीचे प्रमुख संशोधन केंद्र आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें