21) मध्यप्रदेश ( Madhyapradesh )
रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य भाग विसावा दिनांक :- 30 जुलै 2023 वार - रविवार 20) राज्य - मध्यप्रदेश माहिती रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य ● मध्यप्रदेश हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. ● २०११ च्या जनगणनेनुसार मध्यप्रदेश लोकसंख्येत ६ व्या क्रमांकावर आहे. ● मध्यप्रदेशला भारताचे ह्रदय देखील म्हटले जाते, कारण ते भारत देशाच्या मध्यावर आहे. ● मध्य प्रदेशात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला " टायगर स्टेट " या नावाने सुद्धा ओळखले जाते. ● फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून हा प्रदेश ओळखला जात होता. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती. ● राज्याचे ६ सांस्कृतिक विभाग आहेत ; निमाड, मालवा, बुंदेलखंड, बघेलखंड, महाकौशल आणि ग्वालियर. ● भारताच्या मध्य प्रदेश हे राज्य, भाषावार प्रांतरचनेनंतर १ नोव्हेंबर इ.स. १९५६ ला बनवले गेले. ● १ नोव्हेंबर इ.स. २०००ला पुन्हा त्यातून छत्तीसगढ हा विभाग वेगळा होऊन त्याचे स्वतंत्र्य राज्य निर्माण केले गेले. ● नर्मदा नदीच्या ...