विशेष भाग महाराष्ट्र ( Maharashtra )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपले राज्य ; महाराष्ट्र राज्य विशेष भाग दिनांक :- 01 मे 2023 वार - सोमवार महाराष्ट्र राज्याची निर्मिती 01 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रीयन नागरिकांना मनस्वी शुभेच्छा ...! आपल्या महाराष्ट्राविषयी माहिती 1. महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे. 2. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी असून कवी राजा बढे लिखित जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आहे. 3. महाराष्ट्र राज्य भारत देशातील लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. 4. सुरवातीच्या काळात महाराष्ट्राला बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि बॉम्बे स्टेट या नावाने ओळखले जायचे. 5. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची सुमारे 1,646 मीटर आहे. 6. महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे तर मुंबई शहर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे. 7. गोदावरी, भीमा आणि कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत. 8. शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी चार ज्योतिर्...