संदेश

मई, 2023 की पोस्ट दिखाई जा रही हैं

01) अरुणाचल प्रदेश ( Arunachal Pradesh )

चित्र
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य  भाग पहिला दिनांक :- 01 जून 2023 वार - गुरूवार 01) राज्य- अरुणाचल प्रदेश  माहिती ★ अरुणाचल प्रदेश  हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. ★ हे राज्य भारताच्या अगदी  पूर्वेला  येत असल्याने भारतात सर्वात आधी  सूर्य  या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच  सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश  हे नाव मिळाले आहे. ★ या राज्याच्या  सीमा   चीन  व  म्यानमार  या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी  इ.स. १९६२  साली  युद्ध  केले होते. ★ अरुणाचल प्रदेशाची राजधानी इटानगर आहे.  ★ अरुणाचल प्रदेशात एकूण 13 जिल्हे आहेत.  ★ अरुणाचल प्रदेशात हिंदी आणि इंग्रजी भाषा सोबत  मोनपा  व  मिजी  ह्या येथील प्रमुख  भाषा  बोलली जाते. ★ अरुणाचल प्रदेशात 60 विधानसभा मतदार संघ आहेत. ★...

20) पुणे ( Pune )

चित्र
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपले राज्य ; आपला जिल्हा  भाग विसावा दिनांक :- 31 मे 2023 वार - बुधवार 20) जिल्हा -  पुणे  माहिती ● पुणे जिल्हा  हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. ● पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण ''पुणे तिथे काय उणे '' प्रचलित आहे.  ● पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.  ● पुणे जिल्ह्याच्या वायव्येला  ठाणे जिल्हा , पश्चिमेस  रायगड जिल्हा , दक्षिणेस  सातारा जिल्हा , आग्नेयेस  सोलापूर जिल्हा  तर ईशान्य व पूर्वेस  अहमदनगर जिल्हा  आहे. ● पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले आहे. ● छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. ● छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. ●  संत ज्ञानेश्वर  महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे आहे. ● संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान देहू हे पुणे जिल्ह्यातील. ● पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे...

36) हिंगोली ( हिंगोली )

चित्र
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपले राज्य ; आपला जिल्हा  भाग छतीसावा दिनांक :- 30 मे 2023 वार - मंगळवार 36) जिल्हा - हिंगोली  माहिती ◆ हिंगोली जिल्हा  हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे.  ◆ हिंगोलीच्या उत्तरेस  वाशिम जिल्हा  व  यवतमाळ जिल्हा , पश्चिमेस  परभणी जिल्हा  व आग्नेयेस  नांदेड जिल्हा  आहे,  ◆ हिंगोली जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली.  ◆ हिंगोली जिल्हा पूर्वी  परभणी  जिल्ह्याचा एक भाग होता.  ◆ हिंगोली जिल्ह्यात पाच तालुके आहेत - औंढानागनाथ, वसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव  ◆ जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत.  ◆ ज्वारी व कापूस ही हिंगोली जिल्ह्याची मुख्य पिके आहेत. ◆ वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील गोरक्षनाथ महाराजांचे देवस्थान आहे. येथे  पौष पौर्णिमेला  यात्रा सुरू होते. खुप ठिकाणांवरून येथे भाविक येतात. ◆ बारा ज्योतिर्लिंगांपैकी औंढानागनाथ हे आठवे (आद्य) ज्योतिर्लिंग आहे. भगवान शिवाचे हे मंदीर आहे. ...

35) सोलापूर ( Solapur )

चित्र
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपले राज्य ; आपला जिल्हा  भाग पस्तीसावा दिनांक :- 29 मे 2023 वार - सोमवार 35) जिल्हा - सोलापूर  माहिती ◆ सोलापूर शहर हा एकूण १६ गावानी मिळून बनलेला आहे म्हणून त्या जिल्ह्याला सोलापूर हे नाव पडलेले आहे. ◆ महाराष्ट्राचे दैवत असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर पंढरपूर येथे आहे, पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात येते.  ◆ पंढरपूरला दक्षिणेची काशी समजली जाते.  ◆ पंढरपूर  हे गाव भीमा नदीच्या ( चंद्रभागा ) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात.  ◆ आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. ◆ तेलगू, कन्नड आणि मराठी असा भाषा त्रिवेणी संगम झालेला जिल्हा म्हणजे सोलापूर ◆ सोलापूर हा  महाराष्ट्रात टॉवेल व चादरी निर्माण करणारा जिल्हा आहे.  ◆ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलुज ही ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आली आहे. ◆ सोलापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुका व दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका म्...

34) सिंधुदुर्ग ( Sindhudurg )

चित्र
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपले राज्य ; आपला जिल्हा  भाग चौतीसावा दिनांक :- 28 मे 2023 वार - रविवार 34) जिल्हा - सिंधुदुर्ग  माहिती ● राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आहे. ● सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे. ● सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते. ● पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.  ● सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३८) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. ● सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना 01 मे 1981 साली झाली.  ● सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले.  ● शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे.  ● १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला ● सिंधुदुर्गच्या पश्च...

33) सातारा ( Satara )

चित्र
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपले राज्य ; आपला जिल्हा  भाग तेहतीसावा दिनांक :- 27 मे 2023 वार - शनिवार 33) जिल्हा - सातारा  माहिती ● सातारा शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे. ● सातारा जिल्‍हा मराठी राज्‍याची राजधानी होती. ● त्‍याचा विस्‍तार सुमारे १४ लक्ष कि .मी. इतका होता.  ● ई.स.पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते.   ● पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे. ● सर्वात जास्त सैनिक असलेले जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे सातारा होय. अपशिंगे गावाची सैन्यात जाण्याची परंपरा आहे. ● दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते. ● हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘ चालुक्य ‘ ,’ राष्ट्रकुट ‘,’ शिलाहार ‘, देवगिरीचे यादव ,’ बहमनी ‘ व ‘ आदिल शहा ‘,(मुस्लिम राज्यकर्ते ),’ शिवाजी महाराज ‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आ...

32) सांगली ( Sangli )

चित्र
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपले राज्य ; आपला जिल्हा  भाग बत्तीसावा दिनांक :- 26 मे 2023 वार - शुक्रवार 32) जिल्हा - सांगली  माहिती ◆ सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे.  ◆ जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला  सातारा , उत्तर व ईशान्येला  सोलापूर , पूर्वेला  विजापूर  ( कर्नाटक ), दक्षिणेला  बेळगाव  ( कर्नाटक ), नैर्ऋत्येला  कोल्हापूर  व पश्चिमेला  रत्‍नागिरी  हे जिल्हे आहेत.  ◆ पश्चिमेकडील  शिराळा  तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो.  ◆ जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे.  ◆ कृष्णा खोऱ्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे. ◆ सांगली जिल्ह्यात 10 तालुके आहेत  :-  शिराळा ,  वाळवा ,  तासगांव ,  खानापूर (विटा) ,  आटपाडी ,  कवठे महांकाळ ,  मिरज ,  पलूस ,  जत  व  कडेगांव ◆ जिल्हयात सांगली मिरज व कुपवाड ही महानगरपालिका तसेच इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा...

31) वाशिम ( Washim )

चित्र
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपले राज्य ; आपला जिल्हा  भाग एकतीसावा दिनांक :- 25 मे 2023 वार - गुरूवार 31) जिल्हा - वाशिम  माहिती ◆ अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन ०१ जुलै १९९८ रोजी  वाशीम  हा जिल्हा स्थापन झाला.  ◆ वाशीम हे  विदर्भाच्या पूर्व भागात  आहे.  ◆ वाशिम ही वाकटकांची राजधानी होती. ◆ वाशीम शहराचे प्राचीन नाव  वत्सगुल्म  होते.  ◆ वाशिम जिल्ह्यात सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, कापूस, ऊस आणि हळद ही मुख्य पिके आहेत ◆ वाशिम जिल्ह्यात 6 तालुके आहेत - कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम ◆ वाशिम जिल्ह्यामध्ये गोंड, बंजारा आणि आंध या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात ◆ मालेगाव हा वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. ◆ वाशीम जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत.  ◆ पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे.  ◆ कास ही तिची मुख्य उपनदी आहे.  ◆ कास नदी पैनगंगेस मसला पेन या गावाजवळ मिळते....

30) वर्धा ( Vardha )

चित्र
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपले राज्य ; आपला जिल्हा  भाग तीसावा दिनांक :- 24 मे 2023 वार - बुधवार 30) जिल्हा -  वर्धा  माहिती ● वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. ● जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही.  ● पूर्व व उत्तरेस  नागपूर जिल्हा , पश्चिमेस  अमरावती जिल्हा  आणि दक्षिणेस  यवतमाळ जिल्हा  व  चंद्रपूर जिल्हा  आहे.  ● वर्धा नदी ही  अमरावती जिल्हा ,  यवतमाळ जिल्हा  व  चंद्रपूर जिल्हा  या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते. ● वर्धा जिल्ह्यात 08 तालुके आहेत - आर्वी ,  आष्टी ,  सेलू ,  समुद्रपुर ,  कारंजा (घाडगे) ,  देवळी ,  वर्धा  आणि  हिंगणघाट ● वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत.  ● वर्धेचे पूर्वीचे नाव पालकवाडी होते. वर्धा नदीच्या नावावरूनच या ठिकाणाला वर्धा हे नाव देण्यात आले. ● सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव आहे.  ● सन १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधीजींचे निवासस्...

29) लातूर ( Latur )

चित्र
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपले राज्य ; आपला जिल्हा  भाग एकोणतीसावा दिनांक :- 23 मे 2023 वार - मंगळवार 29) जिल्हा - लातूर  माहिती ● लातूर हे महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे.  ● जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे.  ● उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन 16 ऑगस्ट 1982 या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. ● लातूर जिल्ह्यात 2 लोकसभा व 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. ● लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत. ● लातूरला मांजरा नदीतून पिण्याचे पाणी मिळते. ● लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती - केशवराव सोनवणे, विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर  ● केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र चाकूरला व बाभळगाव (लातूर) येथे आहे. ● लातूर संपूर्ण भारतात कडधान्ये व विशेषतः तूर डाळीसाठी प्रसिद्ध आहे. ● लातूरमध्ये आंब्याची केशर नावाची जात विकसित झालेली आहे. ● केशवराव सोनवणे यांनी सहकारी तत्त्वावर डालडा कारखाना स्थापन केला. ● भारताच्या सर्वा...