16 ) नागालँड ( Nagaland )
रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम आपला देश ; आपले राज्य भाग सोळावा दिनांक :- 25 जून 2023 वार - रविवार 16) राज्य - नागालँड माहिती • नागालॅंड हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. • नागालॅंड राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. • नागालॅंड राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. • नागालॅंड राज्याचे क्षेत्रफळ १६,५७९ चौ.किमी असून लोकसंख्या १९,८०,६०२ एवढी आहे. • कोहिमा ही नागालॅंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. • ॲंगमी व चॅंग ह्या नागालॅंड येथील प्रमुख भाषा आहेत. • शेती, हातमाग व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख उद्योग आहेत. • तांदूळ, डाळ, ऊस व कापूस ही नागालॅंड येथील प्रमुख पिके आहेत. • नागालॅंड या राज्याची साक्षरता ८०.११ टक्के एवढी आहे. • नागालॅंड राज्यात एकूण 15 जिल्हे आहेत. • दिमापूर विमानतळ हा नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ आहे. • दिमापूर येथे हिडिंबा नावाच...